बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

आजच्या ठळक बातम्या – बीड जिल्हा दि.०६ जुन २०२५


आजच्या ठळक बातम्या (बीड जिल्हा दि.०६ जुन २०२५)

  • मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणावरून टीका केली. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहील, असे ते म्हणाले.
  • बकरी ईद नमाजची वेळ बीडमधील विविध ईदगाह आणि मशिदींमध्ये ईद-उल-अजहा नमाज पठणाची वेळ सकाळी ६:१० ते ८:४५ पर्यंत आहे.
  • माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पंचगल्ले यांच्याकडे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची अमरावती येथे बदली झाल्याने, बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार संजय पंचगल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे.
  • बीडमधील साठे चौकातील वादप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल बीड शहरातील साठे चौकात झालेल्या राडाप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता बीड शहरातील नगर भूमापन क्र. १७९९ या जागेवर सहकार संकुल इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १४ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली येतील.
  • हॉटेल व्यावसायिक गणेश चव्हाण यांचा अपघाती मृत्यू बीड तालुक्यातील उदंड बडगाव येथून बीडकडे येणाऱ्या हॉटेल व्यावसायिक गणेश चव्हाण यांना भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
  • शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न बीड तालुक्यातील नागापूर (खुर्द) येथे महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात राबवण्यात आले. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
  • चौसाळ्यातून चोरीला गेलेली मोटारसायकल बायपासला सापडली नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल बायपासवर शुक्रवारी पहाटे सापडली. चोरट्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला.
  • जपानमधील ‘जेन झी’ पिढीमध्ये ‘क्वायट क्विटिंग’ संकल्पना वाढत आहे जपानमध्ये ‘जेन झी’ (१९९५ ते २०१२ दरम्यान जन्मलेली) पिढीमध्ये ‘क्वायट क्विटिंग’ म्हणजेच शांतपणे नोकरी सोडणे किंवा कमीत कमी काम करणे ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • बीड पोलीस दलातील बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बीड जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावात आहेत. ७० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या बदली आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिले आहे.
  • पाटोदा शहरातील आंबेडकर चौकातील अतिक्रमणाविरोधात आत्मदहनाचा इशारा पाटोदा शहरातील आंबेडकर चौकात झालेल्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने, १६ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • माजलगावात अझाद नगरमध्ये गटारीचे पाणी घरात; पालिका प्रशासनावर नागरिकांचा संताप माजलगावातील अझाद नगर येथे गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असून, ते घरांमध्ये पोहोचले आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *