सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपन दादा गव्हा़ंडे यांच्या मार्गदर्शनाखाली किन्ही येथे दहावी मध्ये प्रथम क्रमांकांनी उतीर्ण झालेली विद्यार्थींनी कु.शुभांगी काकासाहेब सपकाळ या विद्यार्थींनीला १,१५१ रू रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
यशवंतराव चव्हाण माध्य.विद्यालय किन्ही येथे मराठा प्रतिष्ठान चे तालुका प्रसिध्दी प्रमुख श्री.समाधान शिंदे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी गावातील प्रमुख मान्यवर तसेच ग्रामस्थ युवा तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा प्रतिष्ठान चे समाधान शिंदे यांचे कार्य बनोटी सर्कल मध्ये अव्वल असल्याचे मुख्याध्यापक विलास चौधरी सर यांनी मनोगत व्यक्त केले.
दरवर्षी १५ आॅगस्ट निमित्त गुणवंत विद्यार्थींचे सत्कार आयोजित करण्यात येतो यावर्षी मराठा प्रतिष्ठान च्या वतीने प्रथम बशिस देण्यात आले.