बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

पंकजाताई मुंडे यांनी राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत ; लोकनेत्याच्या वर्ग मित्रांनीही दिले लेकीला आशीर्वाद !

परळी दि. १६:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत अशी अशी सदिच्छा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वर्गमित्रांनी ना. पंकजाताई मुंडे यांना दिली.

परळीत आयोजित केलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वर्गमित्र १४ व १५ ऑगस्ट रोजी एकत्र जमले होते, त्यांनी गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. हे सर्व वर्गमित्र मुंडे साहेबांसोबत १९६५ खाली शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकत होते.
सायंकाळी यशःश्री निवासस्थानी या सर्व मित्रांची भेट स्वतः पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी घेतली. यावेळी या सर्व वर्गमित्रांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.आपल्या व्यस्त कार्यक्रमात स्वतः मंत्री असलेल्या ताईंनी आणि खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी मित्रांना वेळ दिल्याने त्यांचे मन भरून आले. यावेळी सर्वांनी पंकजाताई च्या कामाचे कौतुकही केले सर्वश्री नंदकुमार जोशी (मुंबई), विनायक पिंगळे (मुंबई), सुभाष दगडगुंडे, शाम दंडे, जनार्दन जगतकर (सर्व रा. औरंगाबाद), अब्दुल लतीफ (अंबाजोगाई), सुभाष कदम (लातूर), जयंत जोशी, वल्लभ पंछी, अरूण कुलकर्णी, (सर्व रा. पुणे), सुरेश तोताडे, श्रीनिवास टेळकीकर (नांदेड) यांच्यासह परळीतील दिनकर मुंडे गुरूजी, ओमप्रकाश भूतडा, रामप्रसाद मोदानी, पांडुरंग मोदानी, रामदास रामदासी, मुकुंद चुंबळकर, रंगनाथ खकेसर, उत्तमराव जोशी, नारायण देशमुख, शेख पाशासर, मधुकर आडसुळे, प्रकाशसिंग ठाकूर, विठ्ठल आदोडे, मारुती मुंडे गुरूजी, सुभाष नवाडे हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वर्गमित्र उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.