पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याण योजनांची अंमलबजावणी व्हावी आणि हा योजना विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसिद्धी अभियानाच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेचे जिल्हाध्यक्ष किशोर घुगे ज्यांनी पाचोरा येथे घेतलेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण झालेल्या बैठकीत पंधरा सदस्य असलेल्या देखील निवड करण्यात आली यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी शशिकीरण पाटील गोराडखेडा संतोष गोरे पिंपळगाव हरे तर सरचिटणीसपदी राजू तडवी अटलगव्हान तसेच चिटणीस म्हणून किरण राजपूत नगरदेवला ,सोशल मीडिया अध्यक्ष-:
ज्ञानेश्वर युवरें पाचोरा ज्यांची निवड करण्यात आली या तालुका कार्यकारणीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणून मनीष काबरा पाचोरा ज्ञानेश्वर चौधरी सातगाव यशवन्त पवार भोजे दीपक कळवत्रे डोंगरगाव योगेश जडे पाचोरा महेंद्र पाटिल परधाडे रमेश मोरे वागुलखेडा गणेश पाटील गवांडे वाडी अनिल पाटील शेवाळे यांची निवड करण्यात आली .यावेळी झालेल्या बैठकीला संस्थेचे रवींद्र पाटील संतोष मोरे शिवशंभूचे हर्षल पाटील,अनिलसिंग पाटील गिरीश बर्वे उपस्थित होते