ढाळेवाडी येथे मोठ्या उत्साहात अखंड हरीनाम सप्ताह पार पडला

पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी हे छोटेसे २००० लोकसंख्या असलेले खेडेगाव,गावातील लोक जास्त प्रमाणात पाऊस व रोजगार उपलब्ध नसल्याने उसतोडणीला जातात त्याच गावात गेले २७ वर्षे अखंडपणे वारकरी संप्रदायाचा वसा पुढे सुरू आहे,दि.११ते १७या सात दिवसांत स्व.भागवानभाऊ व वामनराभाऊ येडशिकरयांच्या कृपाशीर्वादाने व वैराग्यामूर्ती भाजनासम्राट हनुमान महाराज मते यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.
ग्रामदैवत सिध्दनाथ श्रावणी यात्रेनिमित्त या सप्ताहाचे नियोजन केले जाते,तेव्हा गावातील गावकरी तरूणवर्ग शिक्षण,नोकरी, व्यवसाय व रोजगारासाठी पुणे मुंबई औरंगाबाद व अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले गावकरी याठिकाणी दरवर्षी नचूकता येतात, मोठ्या उत्साहात सिध्दनाथ पालखी सोहळा व महापंगतीचा कार्यक्रम गावांमध्ये दरवर्षी पार पाडतो.ह. भ. प.हनुमान महाराज मते यांनी काल्याचे कीर्तन व दहीहंडी फोडुन या सप्ताहाची सांगता केली.
या माध्यमातून गावातील युवकांची एकता सामाजिक दृष्टिकोन बदलण्याचे काम या माध्यमातून होत आहे असे मत गावातील तरुण वर्गाने व्यक्त केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.