ब्रेकिंग न्युज

पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस

आठवडा विशेष —

मुंबई : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जो धडका दिला, त्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच जलप्रलय उडवून दिला. अनेक जिल्ह्यांमध्ये घरात पाणी घुसलं, शेतकऱ्यांचंही नुकसान झालं. पण त्यानंतर पावसाने जरा विश्रांती घेतली होती.
मात्र आता, पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन होणार असल्याचं हवामान खातं आणि अभ्यासक सांगतायत!
मुंबईसाठी 3 तासांचा रेड अलर्ट!

मुंबई आणि उपनगरांसाठी हवामान खात्याने आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा शहरात जोमाने हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 3 दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत.
जितकं शक्य असेल तितकं घरातच राहा, गरज असल्यासच बाहेर पडा – असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात येतोय.
डख सरांचा इशारा – “12 ते 20 जून, पावसाचा धुमाकूळ!”

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 12 जूनपासून राज्यभर मुसळधार पाऊस पडणार आहे.
विशेषतः बीड, अहिल्यानगर, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, पश्चिम व पूर्व विदर्भ, खान्देश आणि कोकण या भागांत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे.

“पेरणीची तयारी लगेच पूर्ण करा! विशेषतः सोयाबीनची पेरणी 11 जूनपर्यंतच उरकून घ्या,” – असं स्पष्ट आवाहन डख सरांनी केलंय.

चंद्रपूरमध्ये पावसाची दमदार एंट्री

चंद्रपूरमध्ये आज संध्याकाळी अचानक जोरदार पाऊस झाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या 10 दिवसांत इथे पावसाची चाहूलही नव्हती. तापमान थेट 42 अंशांपर्यंत पोहोचलेलं!
पण आज, मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पडलेल्या सरींनी शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण केला आहे.
रत्नागिरीतही पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठ जलमय झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून, काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

कोकणातलं रत्नागिरीही मागं नाही. इथेही आज मुसळधार पावसाने वातावरण गार केलं. मंगळवारपासून या पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

सोयाबीन पेरणी 11 जूनपर्यंत पूर्ण करा

शेतीची कामं तातडीनं उरकून घ्या

पावसाळ्याचा जोर लक्षात घेऊन निचऱ्याची व्यवस्था करा

थोडक्यात काय?
पावसाळा आता खऱ्या अर्थाने येतोय!
शेतकरी असाल, की मुंबईत राहणारा – आता सावध राहा, सज्ज राहा. कारण जून महिन्याचा दुसरा आठवडा, राज्यासाठी पावसाच्या साचक आठवड्यापैकी एक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button