सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव शहरात तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहण तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर शासकीय ध्वजारोहणासोबत शासकीय रक्षाबंधन साजरे करण्यात आले,दरम्यान यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,आदीना संध्या मापारी यांनी रक्षाबंधन साजरे केले.पंचायत समिई कार्यालयातही गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना राखी बांधून नागरिकांचे कामे करण्याचे अनोखी भेट देत पंचायत समिती कार्यालयात एक वृक्ष एक कर्मचारी हि अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे.
वृक्ष लागवड मोहिमेत विशेष मोहीम म्हणून पंचायत समिती कार्यालयाने या संकल्पनेला प्रारंभ केला ऐन रक्षाबंधनचं दिवशी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी हि संकल्पना राबविली या उपक्रमात पंचायत समितीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एक वृक्ष जगविण्याची हमी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतली आहे.दरम्यान तहसील कार्यालयात झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात तहसील,पंचायत समिती,वनविभाग,पोलीस ठाणे,शहरातील प्राथमिक व माद्यामिक शाळा,सामाजिक वनीकरण,जलसंधारण,पाटबंधारे,तालुका कृषी विभाग,भुमिअभिल्लेख,पर्यटन विकास मंड