सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
निंबायती गावालगतच्या असुरक्षित गाव पुरवठ्याच्या रोहीत्राचा सोमवारी पहाटे अचानक वीजप्रवाह गावभर उतरल्याने या रोहित्राजवळून जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या पाच शेळ्यापैकी प्रताप मिठाराम चव्हाण यांच्या मालकीच्या दोन शेळ्या रोहीत्राकडे ओढल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित तीन शेळ्या गम्भीरावस्थेत बाहेर काढण्यास ग्रामस्थांना यश आले परंतु रोहीत्राला स्पर्श झालेल्या शेळ्यांना काढण्यासाठी मदतकार्य करणाऱ्या दोन तरुणांना वीज प्रवाहाने वीस फुटावर फेकल्याने दोन्ही तरुण गंभीर भाजले असल्याची घटना निंबायती ता.सोयगाव गावात घडली.या घटनेमुळे गावभर गोंधळ उडाला होता.