जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव-बनोटी रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावर पावसामुळे खड्डेमय झाल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी झाल्याची घटना जरंडी गावाजवळ घडली.या घटनेत दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून तातडीने उपचारासाठी त्यास सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संदीप धनराज चव्हाण(वय २८)रा.वारसाडे तांडा ता.पाचोरा जि.जळगाव हा जरंडी गावाकडून मोटारसायकल क्र-एम-एच-१९ ११३३ वरसाडे तान्ड्याकडे जात असतांना पावसामुळे झालेले रस्त्यावरील खड्डे यामुळे त्याचा तोल घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.दरम्यान सोयगाव-बनोटी रस्त्यावर खड्डे झाले असून या रस्त्याची डागडुजी नित्कृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.