कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

#CoronaVirus बीड: आज दि.२८ रोजीच्या अहवालात ५ कोविड-१९ संसर्ग पाॅझिटीव्ह रुग्ण

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातुन आज गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींच्या स्वॅबपैकी ५ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आले असून ३६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

आज कोरोना (कोविड-१९) पाॅझिटीव्ह आलेल्या ५ कोरोना रुग्णांपैकी १ पाटोदा शहरातील, ३ पाटोदा तालुक्यातील कारेगावचे तर १ धारूरचा आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६१ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यापैकी ३ उपचारानंतर बरे झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे तर सहा जणांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. सध्या बीड जिल्ह्यात ५१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या ― ४१

पॉजिटिव्ह अहवाल―५

निगेटिव्ह अहवाल―३६

रुग्ण आढळलेल्या गाव व तालुका

‘1’ ― पाटोदा शहर

‘1’ ― धारूर

‘3’ ― कारेगाव ता पाटोदा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button