बीड: सोयाबीन विमा संदर्भातील तक्रार निवारण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी परळीत

परळी:आठवडा विशेष टीम―गतवर्षी मंजूर झालेल्या सोयाबीनच्या पिकविम्यातून परळी तालुक्याला वगळण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांची बाजू घेत विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांना पिकविमा देण्याचे मान्य करण्यात आले. ज्या शेतकर्‍यांच्या पिकविमा वाटपात अडचणी येत आहेत. अशा शेतकर्‍यांच्या तक्रार निवारण्यासाठी ओरिएंटल व बजाज विमा कंपनीचे अधिकारी परळी कृषी कार्यालयात दाखल झाले असून ते शेतकर्‍यांच्या तक्रारीचे निरसन करणार आहेत.शेतकर्यांनी आपल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी परळी तालुका कृषी कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ व शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या पिकविम्यास परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना वगळण्यात आल्याने शेतकर्‍यात माठी नाराजी पसरली होती. एैन दुष्काळाच्या काळात विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या विम्याचे पैसे अडवून धरले होते. या विमा कंपन्यांना राज्य व केंद्र शासनाकडून कुठलाही जाब विचार जात नसल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या पिकविम्यास मुकन्याची स्थितीत निर्माण झाली होती. याच दरम्यान विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ७ तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना सोयाबीनचा विमा देण्याचे मान्य करण्यात आले होते. सदरील पिकविमा वाटपात अनेक अडथळे येत असून हे अडथळे दुर करण्यासाठी ओरिएंटल कंपनीचे गणेश कचरे व बजाज विमा कंपनीचे आकाश काळुंके हे परळी तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध असून परळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या पिकविमा वाटपा संदर्भातील तक्रारी दाखल करुन त्याचे निरसन करुन घ्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे. विमा कंपनीचे हे अधिकारी शेतकर्‍यांच्या तक्रारी जाणून घेवून विमा वाटपा संदर्भातील त्रुटीदुर करणार आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.