सोयगाव:विधानसभा निवडणूक पूर्वतयारी,सोयगावला पहिली बैठक,मतदान केंद्राध्यक्षाना सूचना

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागताच प्रशासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीला तालुका प्रशासन लागले आहे.मंगळवारी सोयगावला तहसीलच्या सभागृहात कन्नड आणि सिल्लोड विधानसभा मतदार केंद्रातील १०३ मतदान केंद्राध्याक्षांची बैठक घेण्यात आली.
तहसीलदार प्रवीण पांडे यांचं अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळणी,इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र,आणि व्ही,व्ही पॅट जनजागृती यावर भर देण्याच्या अत्यावश्यक सूचना देण्यात आल्या.तसेच गावागावात मतदान जनजागृती,शाळांमध्ये चुनावी पाठशाला मंच तयार करून पंधरा दिवसाला बैठका घेणे,या व्यतिरिक्त निबंध स्पर्धा,वाढदिवस स्पर्धा,सायकल फेऱ्या यामाध्यमातून मतदार जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मतदार यादीत अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या नावे सांकेतिक चिन्ह मिळणार-

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदान यादी प्रसिद्ध करतांना त्या भागातील आमदार,खासदार,जिल्हा परिषद सदस्य,सरपंच,पंचायत समिती सदस्य,दिव्यांग मतदार यांची नावे मतदार यादीत चिन्हांकित होणार असल्याने मतदान करतांना या व्यक्तींची ओळख होणार आहे.बैठकीला निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,सतीश देशमुख,मकसूद शेख,सुधीर जहागीरदार,आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.