अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी झालेली सर्व पिके वाळून,जळून व करपून गेली आहेत.अनेक गावात अद्याप पेरण्याही झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच शेतक-यांना कामच उपलब्ध होत नाही.याचा सारासार विचार करून अंबाजोगाई तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
बुधवार,दिनांक 21 ऑगस्ट रोजी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेश देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पावसाअभावी पेरणी झालेली पिके करपून गेली आहेत. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा,कडबा उपलब्ध होत नाही. पिण्याचे पाणी मिळत नाही अशा अनेक समस्यांनी सध्या
शेतकरी बेजार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ अंबाजोगाई तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत.त्या
शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत,जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात,रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करावीत,रब्बी पीक विमा मंजूर आहे.तो तात्काळ वाटप करावा आदी मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा सदरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंञी,महसुलमंञी व बीड जिल्ह्याच्या पालकमंञी यांना देण्यात आल्या आहेत.
सदरील निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे, सभापती राजेसाहेब देशमुख,नगरसेवक बबनराव लोमटे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ह हणमंतराव मोरे, नगरसेवक अशोक मोदी,नगरसेवक मिलिंद बाबजे,दत्ता सरवदे, राजेश वाहूळे,श्रीरंग चौधरी,अंगदराव तट, सूर्यकांत पवार,सुगत सरवदे,अनिल पसारकर,मिलिंद शिंदे, आश्रुबा करडे,सुधाकर जोगदंड,शेख जावेद, सादिक शहा,प्रमोद परदेशी,समाधान बनसोडे,नसीब खान पठाण,काकासाहेब जामदार,अमोल शिंदे, अशोक देवकर,अनंत शिंदे,ज्योतीराम पवार, अजिंक्य बिडवे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
चारा छावण्या सुरू करा-सभापती राजेसाहेब देशमुख
यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने पिके करपली आहेत.ग्रामीण भागात तीव्र पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू कराव्यात,तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्या
शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे त्वरीत करून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे.गतवर्षीचा मिळालेला पिक विमा हा जनावरांच्या चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने या वर्षीचा मंजूर रब्बी पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावा.दुष्काळाच्या या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
रोजगार हमीची कामे सुरू करा-माजी आ. पृथ्वीराज साठे
दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात पाऊस न झाल्याने शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करावीत.
रब्बी पीक विमा मंजूर आहे.तो तात्काळ वाटप करावा.