अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― काही दिवसांपूर्वी सांगली,सातारा, कोल्हापुर येथील आलेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले कुटुंब रस्त्यावर आले बेघर झाले अनेक लोक जीव मुठीत घेऊन जिथे जागा मिळेल तिथे राहत आहेत.या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गोरक्षण शाळा वरवटीचे मुख्यप्रवर्तक अॅड. अशोक मुंडे यांनी पुढाकार घेवून मदत फेरी काढली.जमा झालेली मदत त्यांनी सांगली येथील पूरग्रस्तांच्या 7 कँम्पमध्ये स्वतः पूरग्रस्तांना दिली.
अॅड.अशोक मुंडे यांनी तालुक्यातील मगरवाडी, मोरेवाडी,शेपवाडी व नागझरी या ग्रामीण भागात लोकांना आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पुरग्रस्तांसाठी कपडे तसेच आसाराम बापु आश्रमाकडून रोगराईवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आयुर्वेदीक औषधी देण्यात आली. हे सर्व साहित्य घेवून अॅड.मुंडे यांनी स्वतः अंबाजोगाई येथून टेम्पो चालक गोपाळ चाटे यांच्यासह सांगली गाठली.प्रत्यक्ष पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावून गेले.त्यानंतर त्यांनी सांगली येथील 7 कॅम्पवर जावून बेघर झालेल्या नागरिकांना मदत केली. यासाठी त्यांना सांगली येथील वॉर्ड क्र 10 च्या नगरसेविका वर्षाताई निंबाळकर,नगरसेवक अमर निंबाळकर, वासंतीताई,इस्लामपूर येथील चंदकांत शिंदे, अंकुश शिंदे,रितेश स्वामी व बापूजीच्या आश्रमातील सर्व अंबाजोगाई येथील साधक तसेच विनोद लोमटे,अशोक केकाण, मोरेवाडी येथील उपसरपंच मोरे काका आदींचे अनमोल सहकार्य लाभले अशी माहिती अॅड.अशोक मुंडे यांनी दिली.