नैराश्यावर मात करून ध्येय साध्य करावे-विठ्ठल कोतेकर

योगेश्‍वरी रोटरीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― आपला उद्योग व्यवसाय कशा रितीने वाढवावा, व्यवसायात आलेले नैराश्य कसे दुर करावे, व्यवसायाचं उत्तम नियोजन कसे करावे दैनंदिन जीवनात ध्येय धोरणे अंमलात आणून यश कसे संपादन करावे आदी मौलीक मार्गदर्शन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर विठ्ठत कोतेकर यांनी केले.

येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्‍वरीच्या वतीने माईंड पॉवर अ‍ॅण्ड बिझनेस डेव्हलमेंट या विषयी एक दिवसीय कार्यशाळेचे रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेला विठ्ठल कोतेकर,त्यांचा मुलगा विवेक कोतेकर, योगेश्‍वरी रोटरीचे अध्यक्ष सदाशिव सोनवणे,सचिव संतोष रेपे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास योगेश्‍वरी रोटरीचे सर्व सदस्य तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय सदाशिव सोनवणे यांनी करून दिला.यावेळी ‘ हम तयार है’ या मोटीव्हेशनल गीताने उर्जा मिळाली.उपस्थित श्रोत्यांपैकी अभिकथाकार विवेक गंगणे यांनी निळु फुले यांच्या आवाजात संयोजकांचे आभार मानले व मनोगत व्यक्त केले.उपस्थित सर्वांचे आभार विजय भोसले यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.