बीड: अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी, सलग दोन दिवस 4 तांड्यांवर कारवाई ; 1 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―सलग दोन दिवस अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी म्हणजे धारावती तांडा, दाऊतपुर तांडा (ता.परळी) व दगडुतांडा आणि चनई तांडा (ता.अंबाजोगाई) या चार ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच गुरूवार, दि.22 ऑगस्ट आणि शुक्रवार,दि.23 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 69 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या जानेवारी 2019 पासुन सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत 121 कारवाईची प्रकरणे करण्यात येवून 24 लाख 7 हजार 19 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच या प्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी, केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती,विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.

याच कारवाई अंतर्गत सलग दोन दिवस धारावती तांडा,दाऊतपुर तांडा (ता.परळी) व दगडुतांडा आणि चनई तांडा (ता.अंबाजोगाई) या चार ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाड टाकून 5 बेवारस गुन्हे नोंदवले. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत.महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत बेवारस 5 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत चारही तांड्यावर बेवारस स्थितीत 7 हजार 100 लिटर रसायन,215 लिटर तयार हातभट्टी दारू,32 बॅरल (200 लिटर),40 किलो ग्रॅम काळा गुळ, 3 टोपली,2 सिंटेक्स टाकी असा एकूण 1 लाख 69 हजार 350/- रूपये (एक लाख एकोणसत्तर हजार तिनशे पन्नास रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला. सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि. के.पाटील,वाहन चालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

सण उत्सव व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई -प्रभारी निरिक्षक अनिल गायकवाड

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मी पदभार घेतल्यापासुन गेल्या जानेवारी 2019 पासुन सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत 121 कारवाईची प्रकरणे करण्यात येवून 24 लाख 7 हजार 19 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच या प्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने तसेच सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध दारू निर्मिती,विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 10 कारवाया करून एकुण 10 गुन्हे नोंदविण्यात आले.यात एक लाख 80 हजार 624 रूपये किंमतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ज्यात देशी विदेशी मद्य, हातभट्टी दारू,ताडी रसायन,काळा गुळ यासह इतर साहित्याचा समावेश आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.