औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी चे इच्छुक उमेदवार अरुण रोडगे यांचा प्रचार दौरा सुरू

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―ओबीसी चळवळीतील जेष्ठ नेते तथा पंचायत समिती गंगापूर चे माजी सभापती श्री अरुण रोडगे पाटील यांचा गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीत च्या रणधुमाळी च्या तयारी साठी प्रचार यंत्रणेला सुरुवात झाली असून आज त्यांनी कायगाव, लाखमापूर,गणेशवाडी,पखोरा, सोलेगाव व तसेच गंगापूर शहर येथील प्रमुख पदाधिकारी तसेच समाज बांधव आणि मतदार यांच्या सोबत कॉर्नर बैठक घेऊन गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करून व निवडणुकीला सामोरे जाताना समाजातील सक्रिय कार्यकर्त्यानी निवडणुकीच्या तयारीला लागावे अशी विनंती माजी सभापती अरुण रोडगे यांनी केली त्यांच्या सोबत प्रमोद पवार,प्रमोद नजन, सोमनाथ कर्डीले, राधेश्याम कोल्हे,राजाभाऊ काळे,सायजीबापू पंडित, गवारे पाटील(अमळनेर) इत्यादी कार्यकर्ते सोबत होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.