अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

श्री.मुकुंदराज विद्यालयात मोफत रक्तगट तपासणी ; 725 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील श्री.मुकुंदराज बालवाडी,प्राथमिक, माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयात 725 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली.

श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय
ज्ञानोबाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत गुरूवार, दि.22 ऑगस्ट रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब ज्ञानोबाराव पाटील तर व्यासपीठावर बीड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय ज्ञानोबाराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.विजयाताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस रणजित लोमटे,प्राचार्य एस.जी. गुळभिले, मुख्याध्यापिका के.एस. कोंडपल्ले,पर्यवेक्षक ए.एम.गडकर,राजर्षी शाहु पॅरामेडीकल कॉलेजचे प्रमुख डॉ.प्रशांत चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी सहकार व शिक्षण महर्षी स्व.डी.एन. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता बालवाडी ते इयत्ता 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच राजर्षी शाहु पॅरामेडीकल कॉलेजच्या वतीने इयत्ता 4 थी ते 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी ही करण्यात आली.

रक्तगट तपासणी शिबीराच्या यशस्वितेसाठी पॅरामेडीकल कॉलेजचे प्रमुख डॉ.प्रशांत चव्हाण,पुजा देशमुख, निकीता जोगदंड, विनिता चव्हाण,मंजिरी होळकर,अश्‍विनी गोरे, राधिका डांगे,प्रेमला दिक्षीत,ऋतुजा काशीद उत्कर्षा देशमुख,अनुजा शिंदे,आकाश गोरे, आदित्य देशमुख,अशिष करपे,पठाण,राहुल गडदे,उत्तरेश्‍वर कावळे, तुळशिराम करडे,शुभम खरटमोल,शुभम कावळे आदींसहीत इतरांनी पुढाकार घेतला.या प्रसंगी श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय ज्ञानोबाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस.जी. गुळभिले यांनी केले.तर सुत्रसंचालन के.एम. सोमवंशी यांनी करून उपस्थितांचे आभार बी.टी.सातपुते यांनी मानले.या कार्यक्रमासाठी श्री. मुकुंदराज बालवाडी, प्राथमिक,माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.