पाटोदा:गणेश शेवाळे―आष्टीतील मुख्यमंत्र्यांची सभा महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे प्रतिपादन आ.भीमराव धोंडे यांनी केले,आष्टी येथे दि.२६ रोजी होणारी मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा व जाहिर सभा नियोजनाबाबत आष्टीतील माऊली मंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव दरेकर हे होते. आष्टी तालुक्यात सोमवार दि. २६ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता महाजनादेश याञेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी येथे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आष्टी शहरातील मुर्शदपुर शहराच्या माऊली मंदिर परिसरात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ.भीमराव धोंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष साहेबराव दरेकर , भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,सुभाष धस,प्रविण पवार,बबन झांबरे, वाल्मिक निकाळजे,अशोक साळवे, अरुण निकाळजे,मधुकर गर्जे,उपाध्यक्ष रामदास बडे, लालासाहेब कुमकर,तालुकाध्यक्ष विकास खेडकर,उससभापती आजिनाथ सानप, शैलजा गर्जे, सरपंच संतोष चव्हाण,बाबु कदम, जाकिर कुरेशी,हनुमंत थोरवे,रामदास बडे,आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भीमराव धोंडे म्हणाले दुष्काळाची व्यथा मुख्यमंत्र्यांना मांडुन वाॅटरग्रीड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर करुन पाणी टंचाई प्रश्न कायमचा मिटवण्यासाठीच आता यापुढे प्रयत्न करणार आहे. मागिल सरकारच्या काळात भाजप सरकारने निधी दिला तेवढा निधी मला मी आमदार असताना कधिच आणता आला नाही. सिनेतुन मेहकरीत पाणी येते हि योजना सुरू आहे.उजनी ते कुंटेफळ या योजनेसाठी मागणी करणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धाडसी आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले,राज्यामध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण केले दिल्ली ते मुंबई सारखे महामार्ग अनेक महामार्ग केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने देशातील सामान्य जनतेपर्यंत योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांना मिळु लागले आहेत.कृषी सन्मान योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना,पंतप्रधान आवास योजना,यांसारख्या अनेक आहेत.लोकसभेच्या निवडणूकी अगोदर जम्मु कश्मीर चे कलम ३७० हटवले असते. तर ४५० खासदार निवडून आले असते.