सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― संतोषीमातानगर,पहूरपेठ जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक आघाडी जामनेर तर्फे मा.शरद पवार जीवन गौरव पुरस्कार २०१८-२०१९ चा प्रदान करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच शाळेत नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित असल्याबद्दल व विद्यार्थ्यांचे हित जोपासित असल्याबद्दल दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी भगिरथीबाई मंगल कार्यालय ,गांधी चौक जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रभैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा.जि.प.सदस्य संजयदादा गरुड यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमास जि.प.सदस्या प्रमिलाताई पाटील , सरोजिनीताई गरुड ,मा.नगरसेवक सुरेश धारीवाल , पहुरपेठचे मा.सरपंच प्रदीप लोढा ,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन गव्हारे , शुध्दोधन सोनवणे सर ,यु.डी.पाटील सर ,शैलेश पाटील ,सुनील पाटील सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पी.टी.पाटील यांचे काही माणसे , तरफडा ,आटोपला खेळ आदी कविता प्रकाशित झालेल्या आहेत.जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.