विद्यार्थी हित जोपासण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे―पोपटतात्या भोळे यांचे प्रतिपादन

ज्ञानेश्वर धोंडू पाटील―विद्यार्थी हित जोपासण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे प्रतिपादन जि.प.जळगावचे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी कोदोली ता.जामनेर येथील जि.प.शाळेत आयोजीत केलेल्या शिक्षण परिषदेत केले.
प्रमुख अतिथी म्हणून शिक्षकांसमोर बोलतांना त्यांनी सांगितले की ,जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक हे जीव ओतून शैक्षणिक कार्य पार पाडत आहे त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावत आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून बरेच विद्यार्थी हे जि.प.च्या शाळेत दाखल होत आहे हि अभिमानास्पद बाब आहे.अनेक शाळांमध्ये नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले जात आहे.जि.प.च्या शाळेत सुसंस्कृत विद्यार्थी घडविले जात आहेत.डीजीटल शाळांची संख्या वाढत आहे.शाळेतील मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी शालेय पोषण आहाराबाबत दक्षता घ्यावी.माता पालक, शिक्षक पालक यांच्या वेळोवेळी सभा घेवून विद्यार्थीसंख्या व उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करावी.विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी जि.प.च्या सर्व शाळांनी सहभाग घ्यावा.
यावेळी प्रा.विजेयंद्र पाटील व सरपंच सुषमा पाटील यांनी त्यांचा मुलगा थारंग याचे नाव पहिलीत दाखल केले त्या बद्द्ल सरपंच सुषमा पाटील यांचा सत्कार तसेच संतोषीमातानगर,पहूरपेठचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांना राष्ट्रवादी शिक्षक सेल तर्फे शरदचंद्र पवार जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ,पिंपरखेडचे शिक्षक उमेश बच्छाव यांनी त्यांच्या मुलाचे नाव जि.प.च्या शाळेत दाखल केल्या बद्दल त्यांचा सत्कार ,शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ,गुलाबपुष्प देवून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाटील हे होते.प्रमुख अतिथी पोपटतात्या भोळे शिक्षण सभापती जि.प.
जळगाव ,सरपंच सुषमाताई पाटील ,ग्रां.प.सदस्या योजनाताई लोळ,ए.बी.वाडकर गटशिक्षणाधिकारी पं.स.जामनेर,माजी पं.स.सदस्य तथा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व्ही.पी.पाटील सर ,पहूरपेठ येथील संतोषीमाता नगरचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील , टाकळीकेंद्राचे केंद्रप्रमुख डी.डी.
घ्यार ,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भिमराव आगळे,व्यवस्थापन समितीचे सदस्य अर्जुन कोळी व्यासपिठावर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी ए.बी.वाडकर,डी.डी .घ्यार ,पी.टी.पाटील ,व्ही.पी.पाटील यांनी भाषणे केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भागदरा शाळेच्या उपशिक्षिका आशा पाटील यांनी केले.प्रास्ताविक कोदोली शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्णा वाघ यांनी केले व आभार प्रकाश परदेशी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संतोष कुमावत व टाकळी केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.