पर्दाफाश करण्याआधी काँग्रेसने स्वत:चे थोबाड ‘आरशात’बघावे― आपेट

बीड: साखर कारखाने,सुतगिरण्या, दुधसंघ,बाजार समित्या,बॅका,पतपेढ्या, रेशन,देशी दारूची दुकाने आणि शिक्षण संस्था काढून शेतक-यांना लुटणा-यांनी देवेंद्र सरकारचा पर्दाफाश करण्याआधी स्वत:चे थोबाड ‘आरशात’ बघावे अशी टीका शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली.
ऊसाच्या FRP चे तुकडे करण्याची मागणी करणारी 5879/15 क्रमांकाची याचिका उच्य न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करणारे कॉग्रेसचे अशोकराव चव्हाण,अमित देशमुख आणि गायीच्या दुधाला प्रतिलिटर 27/- रुपये भाव देण्याविरुध्द मुंबई उच्य न्यायालयात 14046/17 क्रमांकाची याचिका करणारे अजित पवारांचे समर्थक शेतकऱ्यांना सामाजिक न्यायाच्या थोतांडावर आणखी किती काळ मुर्ख बनविणार आहेत?
आदर्श,लाॅटरी,ऊसाची FRP, शेतीमालाची MSP, सिंचन,पीकविमा हप्ता,पीककर्ज वाटपात घोटाळे करून मंत्रालय पेटविण्याचा प्रताप कुणी केला? सन 2014 साली भाजपचे 122 आमदार असताना विश्वासमतावेळी देवेंद्र फडणवीसांना विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मतदान का केले?याचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.
सन 2011 साली 97 वी घटनादुरुस्ती करुन दोन साखर कारखान्यामध्ये 25 कि.मी.हवाई अंतराची अट घालून वजनकाटा मारणारे,रिकव्हरी चोरी करणारे, ऊसतोडणी तसेच साखरेचा ऊत्पादन खर्च भरमसाठ दाखवून भ्रष्टाचार करणारे साखर सम्राट, दुधाची मलाई काढून अव्वाच्या सव्वा दराने दुधविक्री करणारे दुधसम्राट आणि शाळा-काॅलेजमधून डोनेशन गोळा करणारे शिक्षणसम्राट शेतकरी आत्महत्त्यांचा कलंक कसा पुसतील? शेतकरी विरोधी कायदे करुन समाजवादी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना धडा शिकविण्याची आणि सरंजामी काँग्रेसचा पर्दाफाश करण्याची हीच योग्य वेळ आहे.