भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी धनराज गुट्टे यांची निवड ; चळवळीतील कार्यकर्त्याला मिळाला न्याय

पुणे:आठवडा विशेष टीम― आज पुणे येथील हडपसर विधानसभा मतदारसंघात आयोजित भाजप च्या विजय संकल्प यात्रेच्या समारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अर्थ व वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व हडपसर चे लोकप्रिय आमदार व भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री योगेश अण्णा टिळेकर यांच्या शुभहस्ते गेल्या 12 वर्षापासून पक्षाचे पूर्णवेळ पक्षाचे काम करणारे श्री धनराज विक्रम गुट्टे यांची आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून निवड करण्यात आली यावेळी भाजप च्या पुणे शहर अध्यक्ष आमदार माधुरिताई मिसाळ ,नगरसेवक संजय तात्या घुले आदी सर्वजण उपस्थित होते .

धनराज गुट्टे हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासात तयार झालेले युवक नेतृत्व आहे . राज्याच्या ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व बीड च्या लोकप्रिय खासदार डॉ प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. गडचिरोली व चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये भाजप चे पक्ष निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे .

एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाने राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिल्यामुळे सर्व युवका मध्ये आनंदाचे वातावरण आहे .

यापूर्वी श्री गुट्टे यांनी भाजप प्रदेश पातळीवर विविध जबाबदाऱ्या व्यवस्थित पणे सांभाळल्या आहेत. एक परखड वक्ता म्हणून व मेहनती कार्यकर्ता म्हणून सुद्धा श्री गुट्टे याना ओळखतात. एका दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आहे .

या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भारत सारकरबीचे रेल्वे मंत्री पियुषजी गोयल ,भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुंडे,जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन ,पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर,शिक्षण मंत्री आशिशजी शेलार,मंत्री जयदत्त क्षीरसागर,खासदार पुनमजी महाजन ,खासदार डॉ प्रीतमताई मुंडे,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकरजी शृंगारे,आमदार सुजितसिंह ठाकूर,आमदार विनायकराव पाटील,आमदार तुषारजी राठोड,आमदार सुधाकरजी भालेराव,आमदार मोहनराव फड,आमदार रामदास आंबटकर,आमदार तानाजी मुटकूळे,आमदार राम पाटील राटोळीकर,डॉ भागवत कराड,श्री गोविंदराव केंद्रे,श्री प्रविन दादा घुगे,श्री सदाशिवजी खाडे, प्रवक्ते श्री गणेशजी हाके,श्री बाबाराव बांगर,श्री अभयजी चाटे ,लातूर भाजप जिल्हाध्यक्ष श्री नागनाथ अण्णा निडवदे, श्री दिलीपराव देशमुख,श्री अशोकराव केंद्रे, श्री भारत भाऊ चामे,श्री प्रकाशराव देशमुख,श्री त्रिंबकराव गुट्टे,श्री वसंतराव दिघोळे,सभापती सौ आयोध्याताई केंद्रे,नगराध्यक्ष सौ अश्विनीताई कासनाळे,भाजप युवा मोर्चा लातूर जिल्हाध्यक्ष श्री अमितजी रेड्डी,अहमदपूर भाजप तालुकाध्यक्ष श्री राम भाऊ बेल्लाळे,तालुका सरचिटणीस श्री बालाजी मुंढे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री तुकाराम फड आदी सर्वांनी धनराज गुट्टे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *