सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यातील मराठा प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूर,सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एकहात मदतीचा उपक्रम राबवून रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पुराने बाधित गावात जावून मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मदतीचे वाटप करून त्यांच्यासोबत वेळ घालावित त्यांना धीर दिला यामध्ये मराठा प्रतिष्ठानच्या वतीने बाधित झालेल्या ग्रामीण भागात अद्यापही मदतीपासून ग्रामस्थ मादीपासून वंचित असल्याचे मराठा प्रतिष्ठानचं निदर्शनास आले यावेळी संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे,जिल्हाध्यक्ष विजय काळे,ज्ञान्श्वर युवरे,आप्पा वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मदतीचे वितरण केले. पॅंट-शर्ट,गहू-तांदूळ,बिस्किट,बिसलेरी पाणी,यासह आर्थिक व अन्नधान्याची भरघोस मदत केली. मराठा प्रतिष्ठानच्या मदतीत दुपारपर्यंत एक हजार नागरिकांपर्यंत मराठा प्रतिष्ठानचा मदतीचा हात पोहचला होता.यावेळी प्रमोद वाघ,समाधान जाधव,प्रकाश गावंडे आप्पा वाघ,ज्ञानेश्वर युवरे,विजय साबळे पाटील,रवींद्र पाटील,योगेश पाटील,प्रदीप पाटील,नाना जुनघरे,अजित राणे,दत्तू पाटील,योगेश पाटील ,ज्ञानेश्वर गवळी, सुनील वाघमारे श्रावण युवरे, बाप्पू पाटील समाधान शिंदे, विजय चौधरी ,सचिन महाजन, प्रशांत पाटील,संदीप पाटील, गोपाल उगले निवृत्ती गावंडे मोल बोरसे ,आबा उगले, पिंटू तायडे ,गोलू शिंदे ,समाधान बावसकर, समाधान घुले,आदींनी मदतीचा ओघ सुरु ठेवला होता.