अंबाजोगाई: न्यु व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमिनिमित्त दहिहंडी व वेशभुषा स्पर्धा

शैक्षणिक क्षेत्रात न्यु व्हिजनने उंचावले अंबाजोगाईचे नांव – नगरसेविका सौ.संगिताताई व्यवहारे
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अंबाजोगाई येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत न्यु व्हिजन पब्लिक स्कुल येथे शनिवार,दि. 24 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहिहंडी व वेशभुषा स्पर्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यामध्ये पुर्व प्राथमिक विभागात वेशभुषा स्पर्धा तर इयत्ता 4 थी ते 10 वी या गटात दहिहंडी स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेविका संगीताताई सुनिल व्यवहारे तसेच प्रा.होट्टे तसेच सौ. अश्विनी पालकर याही कार्यक्रमास उपस्थित होत्या.दहिहंडी स्पर्धेमध्ये शाळेतील चार हाऊसचे विद्यार्थीनी व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये विद्यार्थी गटात ‘रेड हाऊस’ तर विद्यार्थीनी गटात
ग्रीन हाऊस विजयी झाले आहे.पुर्व प्राथमिक विभागामध्ये वेशभूषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण, झाशीची राणी,छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँ साहेब अशा निरनिराळ्या भूमिका साकारल्या अतिशय उत्साहात दोन्ही स्पर्धा संपन्न झाल्या.संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,डॉ.बी.आय. खडकभावी,डॉ.डी. एच.थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्राचार्य रोशन पी.नायर या सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात न्यु व्हिजनने उंचावले अंबाजोगाईचे नांव- नगरसेविका सौ.संगिताताई व्यवहारे
अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात न्यु व्हिजन पब्लिक स्कुलने गेल्या काही वर्षांत संस्थेचे मार्गदर्शक राजकिशोरजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार दमदार कामगिरी करत अंबाजोगाई शहराचे नाव उंचावले आहे.न्यु व्हिजन पब्लिक स्कुल या संस्थेत दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येते विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तीमत्व विकास व्हावा या दृष्टीकोणातून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात.अंबाजोगाईत मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.गेली आठ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.नर्सरी.,एल.के. जी.,यु.के.जी.,पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम,अत्याधुनिक प्रयोगशाळा,वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण, प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा, कला,हस्तकला,नृत्य, संगीत,कराटे प्रशिक्षण, पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केट बॉल ग्राउंड, प्रशस्त क्रिडांगण,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह, प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम. सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारीवृंद,लाँड्री सुविधा,मुलींसाठी स्वतंञ सुविधा (उउढत खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा राजकिशोरजी मोदी यांचा प्रयत्न आहे. गतवर्षी पासून संस्थेने सीबीएसई 11 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत हे अभिनंदनीय आहे.