औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―धनगर समाज आरक्षण ला विलंब लावणाऱ्या राज्य सरकारचा निषेध तसेच धनगर समाज चे कार्यकर्ते माजी सभापती अरुण रोडगे, रंगनाथ राठोड,कैलास मामा रिठे, सुरेश डोळझाके,दिलीप रिठे यांना पोलीस प्रशासनाने दडपशाही करून अटक केली म्हणून आज औरंगाबाद येथे येणाऱ्या महा जनादेश यात्रा मुख्यमंत्री च्या कार्यक्रमा मध्ये धनगर समाज क्रांती मोर्चा वतीने चिकलठाणा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोर डोक्यावर काळा रुमाल बांधून निषेध करण्यात आला तसेच संध्याकाळी होणाऱ्या महा रॅली ला धनगर समाज बांधव मुख्यमंत्री ला भेटून निवेदन देणार आहे या वेळी जगन्नाथ रिठे,नारायण खोसे,डॉ. संदीप घुगरे,सुरेश झोलझाके,संजय फटाकडे, कैलास रिठे,गणेश बनसोडे,रामेश्वर कोरडे,ज्ञानेश्वर रिठे इत्यादी समान बांधव उपस्थित होते.