अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―तालुक्यात पावसाअभावी संपुर्ण पिके ही करपुन गेली आहेत.शेतकर्यांची अवस्था अत्यंत दयनिय बनली आहे.निसर्गाच्या अवकृपेने व दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांच्या उपजिविकेचा प्रश्न, जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.त्यामुळे प्रशासकीय स्तरांवरून तात्काळ पिकांचे पंचनामे करण्यात यावेत व जनावरांना दावणीवर चारा देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सोमवार,दि.26 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील निवेदन केज विधानसभा मतदार संघाच्या आ.प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे व तहसीलदार अंबाजोगाई यांना देण्यात आले आहे. निवेदनावर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष व्यंकटी केंद्रे,उपाध्यक्ष अंकुश शिंदे,मेघराज सोमवंशी,सचिव संतोष भगत,जिल्हा उपाध्यक्ष विलासराव जगताप तसेच तालुक्यातील विविध गावचे सरपंच सर्वश्री भिमराव केंद्रे, संजय मुंडे,आर.डी. नायक,माऊली चौधरी, बलभीम कापसे,गणेश भोसले,दत्तात्रय कांबळे, ज्ञानोबा कवडे,विजय कुंडगर,अनिल शिंदे, श्रीनिवास आगळे, कदम,केंद्रे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन देताना अंबाजेागाई तालुक्यातील विविध गावचे सरपंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.