बँकांनी पीक विमा रक्कम शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर परस्पर वळती करू नये ; अ.भा.मराठा महासंघाचे विभागीय आयुक्तांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यात गतवर्षीचा खरीप पिक विमा मंजुर झाला असून तो शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया तसेच अनेक ठिकाणी वाटपही करण्यात येत आहे. परंतु काही राष्ट्रीय बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सदर मंजुर पिकविम्याची रक्कम तसेच शासनाकडून मिळणारे विविध प्रकारचे अनुदान यांची रक्कम परस्पर शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा करीत आहे.ती करू नये या बाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्तांना उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत शुक्रवार,दि.23 ऑगस्ट रोजी देण्यात आले.

सदरील निवेदनात म्हटले आहे की,ऐन दुष्काळात बँका अन्याय करीत आहेत. त्यामुळे शेतकरी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाऊसकाळ नसल्याने गुरांना चारा व पाणी नाही चारा खरेदीसाठी शेतकर्‍यांना मंजुर पिक विम्याची रक्कम शेतकर्‍याला उपयोगी पडत आहे.तरी राष्ट्रीय बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सदर मंजुर पिकविम्याची रक्कम तसेच शासनाकडून मिळणारे विविध प्रकारचे अनुदान यांची रक्कम परस्पर शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा करीत आहे.ती करू नये या बाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्तांना उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत शुक्रवार रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रताप राणा चव्हाण,नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,दिनेश घोडके,सुशिल जोशी, शेख खलील,शेख मुक्तार यांच्या सहीत अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत व उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.