सोयगावला खरीपाची बाजरी बहरली,हंगामात फळधारणेला पहिला मान बाजरीचा

सोयगाव,दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात बाजरी पिकांनी मानावर काढून बाजरी पिके डोलदार बहरली असून खरिपाच्या हंगामात बहरण्याचा पहिला मान बाजरी पिकांना मिळालेला आहे.त्यामुळे श्रावणानंतरच्या हिवाळ्यात नवीन बाजरीच्या भाकरीची चव चाखायला मिळणार आहे.
सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरीपात पाच हजार हेक्टरवर बाजरीची लागवड करण्यात आली होती.खरिपाच्या मध्यात शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावे लागले असतांना तब्बल १९ दिवसाच्या रिमझिम पावूस त्यातच ढगाळ वातावरण आणि रोगराई यामधून शेतकऱ्यांनी बाजरी पिके वाचविण्यात यश मिळविले असतांना आता बाजरी डोलदार बहरली आहे.परंतु काही भागात बाजरी बहरूनही हिरवटपणा आढळून येत असल्याने बाजरीला काही भागात वातावरण पोषक झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.परंतु खरिपाच्या हंगामात बाजारीने बहरण्याचा पहिला मान पटकाविला आहे.

पाखरे हुसकाविण्याची संकट-

दरम्यान बाजरी पिके डोलदार बहरली असतांना,पक्षी आणि पाखरांना शेती शिवारात भक्ष आणि अन्नधान्य मिळाले असल्याने शेतकऱ्यांना भल्या पहाटेच बाजरी पिकांची राखण करण्यासाठी जावे लागत असल्याने पक्षी आणि पाखरांना हुसकाविण्यासाठी गलुनचा वापर करावा लागत असल्याने जंगलात पक्षांना हुसकाविण्यासाठी काहीप्रसंगी आवाज द्यावे लागत आहे.

हिवाळ्यात नवीन बाजरी खाण्याचा आस्वाद-

सोयगाव तालुक्यात बाजरी पिके बहरली असतांना बाजरी पिकांची नवरात्रच्या महिन्यात कापणी करून आक्टोंबर हिटच्या तडाख्यात तिची वाळवण करण्यात येईल त्यानंतर मळणी करण्यात येणार असल्याने दिवाळीचं सणानंतर नवीन बाजरी खाण्याचा आस्वाद सोयगावकरांना मिळणार आहे.त्यामुळे नवीन बाजरीची भाकरी खाण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी राहिला आहे.

बाजरीचे पिके बहरल्यामुळे खरिपाच्या हंगामात पहिले उत्पन्न म्हणून बाजरीचे पिकांना मान मिळाला असून शेतकऱ्यांची बोटे हिरवी झाली असून खरिपाच्या पिकांच्या उत्पन्नाची आवक सुरु होणार आहे.

सध्या बाजरीला विक्रमी भाव असून उत्पन्न हातात आल्यावर मात्र भाव कमी झाल्यास शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त भाव हातात मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा धडपड सुरु आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.