सौंदाण्यात कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पाटोदा:आठवडा विशेष टीम―तालुक्यातील सौंदाणा येथील एका ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे.सुदाम भाऊराव कदम ( वय ३८रा सौदाना ,ता पाटोदा)असे या शेतकऱ्याचे नाव असुन त्यांनी मागील काही वर्षापासुन सततच्या दुष्काळा मुळे झालेली नापिकी व त्यामुळे होत असलेल्या कर्जाच्या विवंचनेतुन बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान ,पदुबाई शिवरात चिंचेच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली, त्यांना दोन मुली व एक मुलगा असुन मुलीचे लग्न कसे करायचे याचीही सतत त्यांना चिंता होती व या सर्व विवंचनेतुनच अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली, या घटनेविषयी भाऊराव कदम यांनी दिलेल्या खबरीनुसार पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो.हे.कॉ .पांडे करीत आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.