परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

पंकजाताई मुंडे,सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामांचा उद्या शुभारंभ

२० कोटीच्या अंतर्गत रस्ता कामालाही होणार सुरवात ; श्रावणातील ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा - भाजपचे आवाहन

परळी:आठवडा विशेष टीम―राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. २९) वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी रू. आराखड्याच्या कामाचा त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदानातून मंजूर झालेल्या २० कोटी रूपयांच्या शहरातील अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ होणार आहे. नागरिकांनी श्रावणात होणा-या या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या गुरूवारी सायंकाळी ७ वा. वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी एका भव्य कार्यक्रमात तीर्थक्षेत्र विकासाचा आराखड्याच्या तसेच अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. पंकजाताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. आर टी देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तसेच शहरातील पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी केले आहे.

ना.पंकजाताई मुंडेंची संकल्पपूर्ती

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला आहे. या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला आहे.या निधीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम अर्थमंत्र्यांच्या सूचनेवरून ना. पंकजाताई मुंडे यांनी निश्चित करून घेतला आहे त्याचे सादरीकरण देखील यावेळी होणार आहे.

असा असणार विकास आराखडा

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेस हरीहर तीर्थाजवळ दर्शनी मंडप, प्रतिक्षागृह, धर्मशाळा, यात्री निवास, स्वच्छतालयाचे बांधकाम, मेरू पर्वताजवळ कॉटेजचे बांधकाम, मेरु पर्वतावर उद्यान विकसित करणे, मंदिराकडे जाणारे रस्ते विकसीत करणे, हरीहर तीर्थाजवळील उद्यान विकसीत करणे, मंदिर व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे, हेलिपॅड, प्रदक्षिणा मार्ग विकसीत करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, डोंगरतुकाई देवी पोच रस्त्याची कामे, या ठिकाणी उद्यान विकसीत करणे, काळ्या दगडाच्या दीपमाळ बांधणे अशी अनेक कामे आराखड्यातून करण्यात येणार आहेत. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असुन प्रतिवर्षी तीस लाखांहून अधिक भाविक या मंदिराला भेट देतात. भाविकांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्रिशुळ, डमरू, नंदी यांच्या प्रतिकृती, दर्शन रांगेत ओम नम् शिवायः चा जप, बेलाच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्या सर्वांची रोपे इथे लावुन बेलवन, महादेव वन तयार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.