अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कुंबेफळला इंटरनॅशनल स्कूल म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे. राज्यात अशा प्रकारच्या एकूण 81 शाळा आहेत.यापैकी एक शाळा बीड जिल्ह्यात येथे मंजूर करण्यात आली आहे.या शाळेत सीबीएससी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आद्ययावत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे.या पहिल्या शाळेचे उदघाटन बीड जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते व नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके मान्यवरांच्या उपस्थितीत कुंबेफळ येथे आयोजित विशेष समारंभात बुधवार,दि. 28 ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून बीड जिल्हा परिषदेचे परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख तर अध्यक्षस्थानी कुंबेफळच्या सरपंच वृंदावनीताई भोसले या होत्या तसेच यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश गायकवाड,डायटचे प्राचार्य देवगावकर, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत,विस्तार अधिकारी प्रणिताताई कापसे,उपसरपंच मंगलाताई जाधव,शाळेच्या मुख्याध्यापिका उषाताई रामधामी,अंबासाखरचे मुख्याध्यापक रामराजे आवाड,शिराढोणचे मुख्याध्यापक गणेश आंबाड,शालेय समितीचे अध्यक्ष रविकर्ण इंगोले, उपाध्यक्ष स्वातीताई वाघमारे,केंद्रप्रमुख टेकाळे,आर,डी.शिंदे, डायटचे समन्वयक वाघमारे,संपादक अभिजित गुप्ता,पत्रकार रोहिदास हातागळे, शिवाजी डोईफोडे,वसंत शिंपले , काशीद,दत्ता तोडकर,सिध्देश्वर तोडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली,दुसरी व तिसरी वर्गातील जिल्हा परिषद इंटरनॅशनल स्कूलच्या 197 विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रमाची नविन पुस्तके वाटप करण्यात आली.
कुंबेफळ इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी जगात नांव उंचावतील-सभापती राजेसाहेब देशमुख
महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम असून याद्वारे सिबीएसईच्या धर्तीवर आद्ययावत ठरेल असा हा नवा अभ्यासक्रम तयार केला असून या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एकाच पुस्तकात सर्व विषयांची माहिती मिळून व त्याचे आकलन होणार आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांनी ‘इंटरनॅशनल स्कूल’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यातील निकषांनुसार पात्र ठरलेल्या शाळांना मानांकने देण्यात आली. महाराष्ट्रात एकूण 81 जिल्हा परिषद शाळांना इंटरनॅशनल स्कूल करण्याची मंजुरी मिळाली.बीड जिल्ह्यात पहिली इंटरनॅशनल स्कूल होण्याचा बहूमान
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ जिल्हा परिषद शाळेने पटकावला आहे.या शाळेत 15 शिक्षकांचा शिक्षकांचा स्टाफ आहे. यातील 8 शिक्षकांना नुकतेच मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे माननिय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते कुंबेफळ शाळेस मानांकनाचे प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.इंटरनॅशनल स्कूलचा फायदा ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार असून यापुढे शेतकरी, शेतमजूर व कष्टक-यांची मुले व ग्रामीण विद्यार्थी हे इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आपल्या गांवाचे,तालुक्याचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नांव उंचावतील असा आपणांस ठाम विश्वास आहे.कुंबेफळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यातून शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी होत असून याचे समाधान आहे. इंटरनॅशनल स्कूल होण्यासाठी बीड जिल्ह्यातील इतरही जिल्हा परिषदेच्या शाळांनी पुढाकार घ्यावा.