आठवडा विशेष टीम―बहुप्रतीक्षित असलेली पोलीस भरती एकदाची जाहीर झाली आहे. ३ सप्टेंबर २०१९ पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली आहे.तर २३ सप्टेंबर २०१९ च्या रात्री ११.५९ मिनिटाने फॉर्म स्वीकारणे बंद होईल. महापरीक्षा पोर्टल द्वारे परीक्षा घेण्यात येईल. पोलीस भरती संदर्भात सर्वात जलद अपडेट तुम्हाला साप्ताहिक आठवडा विशेष मार्फत दिले मोफत या न्युजपोर्टल वर दिले जातील.
पोलीस भरती साठीची अधिकृत जाहिरात https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या संकेतस्थळावर पाहवी.
महाराष्ट्र राज्यातील तरुण पोलीस भरती साठी वर्षानुवर्षे प्रयत्न करतात तसेच रोजच्या रोज व्यायाम करणे,परीक्षेसाठी सराव यावर त्यांचे लक्ष असते.पोलीस भरती वर्षातून दोनदा घेण्याची देखील मागणी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकांकडून होत आहे.परंतु सरकारने योग्य निर्णय घेऊन युवकांना गृह खात्यात रोजगार देण्याचे काम केले पाहिजे.