पाटोदा: शेख महेशर:― पाटोदा येथे शहिद जवान लान्सनायक अजित वाल्हेकर यांच्या१९ व्या स्मृतीदिना निमित्त व शिक्षकदिनांचे औचित्य साधुन पाटोदा येथील भगवान कृपा हॉस्पिटल येथे पाटोदा नगर पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष श्री.बळीराम पोटे, पञकार संघाचे अध्यक्ष श्री. सोमीनाथजी कोल्हे, नगर पंचायत सभापती श्री. संदिप (दादा)जाधव, डॉ.कृष्णा बी.नागरगोजे, सुजित वाल्हेकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या वेळी विजय वाल्हेकर, प्रा.विजय गायकवाड, शिवराम जाधव, पी.पी.सांगळे, दिपक जाधव, आनंद डोरले, राजेंद्र शिंदे यांच्या सह बहुसंख्येने रक्तदात्याने रक्तदान केले. या वेळी हमीदखान पठाण(संपादक लोकमिञ), पत्रकार शेख महेशर ताहेर(शेतकऱ्यांचे वादळ), सय्यद सज्जाद(संपादक लोकबातमी),एफ.एम.स्टार न्यूजचे वार्ताहर शेख जावेद, मुन्नाभाई केबल, चर्मकार महासंघाचे संतोष तांबे, फोटोग्राफर राहुल सोनवणे दत्ता वाघमारे(मुक्त पत्रकार), सागर तुपे, इस्माईल शेख, शैलेंद्र जाधव यांच्या सह अनेक मान्यवर व बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.
पाटोदा शहरातील व तालुक्यातील रक्तदात्याने बहुसंख्येने रक्तदान शिबीरात हजेरी लावून रक्तदान करावे―सुजित वाल्हेकर
शहिद जवान लान्सनायक अजित वाल्हेकर सेवाभावी संस्था पाटोदा.