अंबाजोगाई तालुका

खोलेश्‍वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने पूरग्रस्तांना दिला 3 लाख 88 हजार 937 रूपयांचा मदत निधी

भाशिप्र संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी

समाजाविषयी संवेदना बाळगण्याचे संस्कार भाशिप्र संस्थेतून मिळतात-अरूणराव डंके

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भाशिप्र संस्थेच्या अंबाजोगाई येथील खोलेश्‍वर शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांना 3 लाख 88 हजार 937 रूपयांचा मदत निधीचे संकलन करण्यात आले.सदर मदत निधी हस्तांतरण समारंभ अंबाजोगाईत बुधवार,दि.4 सप्टेंबर रोजी खोलेश्‍वर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरूणराव डंके म्हणाले की,सामाजिक जाणिवेच्या भावनेने श्री.खोलेश्‍वर संकूलाने पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करून चिमूकल्या हातांनी समाजाविषयी आपल्या संवेदना कायम ठेवल्या. तसेच संस्थेतील विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक,सभासद आणि पदाधिकारी यांनीही याच भावनेतून मदतीचे कार्य केले आहे. त्या सर्वांचा विशेष आभिमान वाटतो, समाजाविषयी संवेदना बाळगण्याचे संस्कार भाशिप्र संस्थेतून दिले जातात असे गौरवोउदगार निधी संकलन व हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी अरूणराव डंके यांनी काढले.

यावेळी व्यासपिठावर पत्रकार प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर, भा.शि.प्र.संस्थेच्या केंद्रीय सदस्या डॉ. कल्पनाताई चौसाळकर, केंद्रिय कार्यकारीणी सदस्य आप्पाराव यादव, माजलगाव येथील सिध्देश्‍वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे,श्री. खोलेश्‍वर शैक्षणिक संकुलाचे स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.किशोर गिरवलकर,स्थानिक कार्यवाह बिपिनदादा क्षिरसागर,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा.शशिकांत टेकाळे, प्राथमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष प्रसाददादा चिक्षे, सी.बी.एस.ई.स्कुल समितीचे अध्यक्ष अविनाश तळणीकर, सौ.वालवडकर,प्रकाश जोशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना अरूणराव डंके म्हणाले की,संकटे आली की,माणूस भांबावून जातो.पण, समाज संकटांना न घाबरता संकट दूर करण्याचा प्रयत्न करतो. संकटे आपल्याला पुरुषार्थ शिकवितात. संकटकाळी चिमुकल्या हातांनी निधी संकलन करुन पुरुषार्थ जपण्याचे काम करून समाजांप्रती असलेली कृतज्ञता जपली.श्री. खोलेश्‍वर संकुलाने जमा केलेल्या निधीतून पूरग्रस्तांना मोठी मदत होईल.त्याबद्दल संस्था पदाधिकारी,शिक्षक व कर्मचारी,विद्यार्थी व पालकांचे डंके यांनी यावेळी अभिनंदन केले. तर पत्रकार अविनाश मुडेगांवकर म्हणाले की, हे विद्यालय केवळ शिक्षण देण्याचेच काम करते असे नाही.तर चिमुकल्या मुलांना उत्तम संस्कारांनी घडवते,सामाजिक संवेदना जागृत करण्याचे काम येथील शिक्षक करतात.आदर्श विचार कृतीतून कसे आणायचे हा आदर्श पुरग्रस्तांसाठी निधीतून विद्यार्थ्यांत रूजला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तर यावेळी अमरनाथ खुर्पे यांनी शिक्षक,विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.प्रारंभी प्रास्ताविक करतांना बिपिनदादा क्षिरसागर यांनी असे सांगितले की,भाशिप्र संस्थाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांनुसार कार्य करते.राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारी नवी पिढी घडावी याच विचाराने संस्था सातत्याने काम करीत आहे.सांगली, कोल्हापूर,मिरज परिसरातील पूरग्रस्त बांधवांसाठी आपण मदत केली पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांत रूजावा,निधी संकलनाचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठीच हा उपक्रम राबविला यात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला त्याबद्दल क्षिरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थिनी अंजली शिनगारे, माणिक मस्के,शिक्षक व पालक होळंबे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी खोलेश्‍वर शैक्षणिक संकुलाच्या खोलेश्‍वर प्राथमिक विद्यालय 44,490/- रूपये,खोलेश्‍वर माध्यमिक विद्यालय 99,061/- रूपये आणि खोलेश्‍वर महाविद्यालय 1,32,291/- शिक्षक, शिक्षीकेत्तर कर्मचारी यांनी सदरील रक्कम संकलीत केली.तर उर्वरीत 1,13,095/- रूपये इतका निधी असे मिळून एकूण 3,88,937/-(तीन लाख आठ्ठयाऐंशी हजार नऊशे सदोतीस रूपयांचा) निधी संस्था विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक,कर्मचारी,पदाधिकारी व सभासदांनी जमा केला.या संकलित निधीचा धनादेश अरूणराव डंके यांना देण्यात आला.सदरील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिपीनदादा क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचालन शैलेंद्र कंगळे यांनी करून उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई धर्मपात्रे यांनी मानले.यावेळी खोलेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, मुख्याध्यापिका सुनंदाताई धर्मपात्रे, जमुनाताई राठोड, उपमुख्याध्यापक राजकुमार वखरे, अरूणराव पत्की आदींसह सर्व शिक्षक कर्मचारी,पालक,संस्था पदाधिकारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जयेंद्र कुलकर्णी यांच्या शांतीमंत्र पठणाने झाली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.