सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुकाभर लष्करी अळींचा प्रादुर्भाव आणि तालुक्याच्या काही भागात झालेल्या कमी अधिक प्रमाणाचा पावसाचा फटका बसलेल्या मका पिकांची कापणी करून नुकसान झालेल्या मका पिकांची जाळून राख केली आहे.गुरुवारी दिवसभर तालुक्यात मक्याचं कानिसासह पिकांची कापणी करून जाळण्यात आल्याचा प्रकार शिवारभर सुरु होता.त्यामुळे तालुक्यात मका पिकांची वाट लागली असल्याने मक्याचे उत्पन्न झीरोवर आले आहे. तालुक्यात मक्याच्या उगमस्थानापासून मक्यावर लष्करी अळींचा वाढता प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले होते,शेतकऱ्यांनी हि बाब तालुका कृषी आणि महसूल विहागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही या दोन्ही विभागांनी केवळ मका पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसाल्याचा प्रकार झाला होता,अखेरीस शासन पातळीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून कृषी विभाग आणि शास्राज्ञांनी दिलेल्या उपाय योजनेनुसार शेतकऱ्यांनी उपाय योजना करून पहिल्या,परंतु शासनाच्या उपाय योजना कुचकामी पडल्याने शेतकऱ्यांनी स्वबळावर उपाय योजना करून महागडी कीटकनाशके फवारणी करून मका पिकांना जीवदान देण्याची प्रयत्न केला.
परंतु या प्रामाणिक प्रयत्नाला निसर्गानेही पुरेशी साथ न दिल्याने जूनच्या अखेरीस पडलेला पावसाचा मोठा खंड आणि जुलै महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने मका पिकांची वाढ खुंटली,मक्याच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी निंदनी,कोळपणी करून मका पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्नरथ सुरूच ठेवला परंतु अखेरीस यश हातात न आल्याने मका पिके हातातून निसटली असल्याने मका पिकांचे नुकसान डोळ्यादेखत न पाहवले गेल्याने गुरुवार पासून बहरून करपलेल्या मका पिकांना अखेरीस तिलांजली देत कापणी करून त्यांची जाळून बोळवण करण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरु केला आहे.
लष्करी अळींच्या प्रादुर्भावावर प्रशासनाच्या उपाय योजना कुचकामी ठरल्याने व काही भागात उपाय योजना राबविण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्याने प्रादुर्भाव वाढतच गेला व त्यातच निसर्गाच्या अवकृपेने अनर्थ घडला व मका पिके हातातून निसटली आहे.त्यामुळे या पिकांना कापणी करून जाळल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता.