औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव:ग्रामसेवकांच्या पाठोपाठ महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप

सोयगाव:आठवडा विशेष टीम―जिल्हाभरात ग्रामसेवकांच्या बेमुदत संपाची झळ सोसवत नाही तोच गुरुवारपासून महसूल कर्मचारीही विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने गुरुवारी तहसील कार्यालयात सन्नाटा पाहून ग्रामीण नागरिकांना मात्र धक्काच बसला,महसूल कर्मचाऱ्यांच्या पुसटशी कल्पनाही नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारूनही यावर निर्णय होत नसल्याने गुरुवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तहसील कार्यालयात कर्मचारीच नसल्याने प्रलंबित कामांसाठी ग्रामीण भागातील गेलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले होते.नुकताच ग्रामसेवकांच्या व संगणक परीचालकांच्या संपामुळे भेदरलेल्या नागरिकांना पुन्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या संपला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.