महाराष्ट्र राज्यसामाजिक

२६ जानेवारीला जळगाव कृ.उ.बा.समितीत विकासकामाचे भूमिपूजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी मंत्री सुरेशदादा जैन,सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील याच्या हस्ते भूमिपूजन

आठवडा विशेष | प्रतिनिधी

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांना अवघ्या १४ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी त्यांनी आपल्या कार्याचा धडाका लावून कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये विकास कामाचा धडका सुरु ठेवला आहे. लकीटेलर यांनी अतिशय अल्पकाळात धडाकेबाज कामगिरी करून बाजार समितीची संथ चाललेला कारभार त्यांच्या कार्यकाळात अतिसंघीय वेगाने झेप घेत आहे.

येणाऱ्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्कट मध्ये पेव्हर ब्लॉग, भुयारी गटार, मुख्य यार्डातील पेव्हर ब्लॉग, व रस्ता डाबरणीकरणसह बाजार समीतील बगीच्याचे नामकरण लोकर्पन सोहळा माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.

यावेळी जळगाव शहराचे आ. राजुमामा भोळे,चोपडा आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,माजी महापौर ललितभाऊ कोल्हे,उपसभापती वसंतराव भालेराव, संचालक मंडळसह व्यापारी वर्ग व शेतकरी बाधव उपस्थित राहाणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची कायापालट व उत्पन्न वाढी संदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकीटेलर यांच्या काळात घेतले आहे याबाबत जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात विकासाबाबत जळगाव बाजार समितीचे नाव निघत आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.