बीड:शेख महेशर― उस्मानाबाद येथील शम्स एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुलशन ए अतफाल उर्दू प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक शागिर्द सर यांना आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सन्मान पुर्वक प्रधान करण्यात आला. हा पुरस्कार शम्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय हाजी लाईक अहेमद साहेब, डॉ.नादाफ साहेब, प्राचार्य सय्यद अख्तर सर, यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
या वेळी शम्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव लाईक अहेमद, डॉ.तबस्सुम सुलताना, अकबर पठाण साहेब, वसीम सर यांची विशेष उपस्थिती होती. शागिर्द सर हे उस्मानाबाद येथील गुलशन ए अतफाल उर्दु प्राथमिक शाळेत उर्दू शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या अभिनित अध्यापनाव्दारे शिक्षण देतात. उर्दूत शिक्षण देताना ते उस्मानाबाद जिल्ह्यात उर्दू शिक्षकांचे आदर्श आहेत.शागिर्द सर यांनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही प्रयत्न केले आहे. परिणामी उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाजातील प्रत्येक घरातील मुलगी शैक्षणिक प्रगती कडे वाटचाल करीत आहे. शागिर्द सर यांचे उर्दू विषयांतच नव्हे तर उर्दूतील इतर विषयावर ही चांगले प्रभुत्व आहे.शागीर्द सर यांच्या कार्याची दखल घेत उस्मानाबाद येथील शम्स एज्युकेशन सोसायटीने त्यांना उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला.
शागीर्द सर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तसेच सर्व कार्यकारिणी मंडळ यांच्या सह मोशिन सर, जुबेर सर, आतार सर, सादात सर, खुर्शीद सर, अदिल सर, इरफान सर, परवेज सर, आसेफ सर, मदार सर यांच्या सह शाळेचे शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग व नातेवाईक हितचिंतक मित्र परिवार यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मी पुरस्कार मिळावा म्हणुन शैक्षणिक कार्य करत नसुन आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या सदभावनेने व अल्लाहने मला दिलेल्या बुध्दी मधील शिकवणीतुन समाज शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या पुरस्काराने मी भारावून गेलो असून माझे उर्दू शिक्षणासाठीचे दायित्व वाढले असून जवाबदारी वाढली आहे.
शागीर्द सर
आदर्श शिक्षक, गुलशन ए अतफाल उर्दू प्राथमिक शाळा उस्मानाबाद.