पाटोदा:शेख महेशर―पाटोदा येथील स्वच्छता दुत गहिनीनाथ दगडू माने उर्फ (माने मामा) वय ८५ वर्षे राहणार तेलंगशी ह.मु. पाटोदा यांचे नुकतेच आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुंदरदास माने यांचे ते वडील होते. माने मामा कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असो सप्ताह असो की पाटोदा शहरातील कोणत्याही मध्ये स्वच्छता असो ते स्वच्छतेचे काम निस्वर्थीपणे करायचे ते सर्वांशी प्रेमाचे व आदराने वागायचे मनमिळाऊ स्वभावामुळे ते पाटोदा पंचक्रोशीत सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्त्व होते. कुठली ही स्वच्छता असो ते नी संकोच पने करायचे धार्मिक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा त्यांच्या जाण्याने पाटोद्यायचे गाडगेबाबा गेले अशी भावना जनसामान्यात व्यक्त केली जात आहे.
माने कुटुंबीयांच्या दु:खात आठवडा विशेष परिवार सहभागी आहे.