पाटोदा: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रुपेश बेद्रे यांची शिलाई मशीनची मदत

पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील सौंदाणा येथील सुदाम भाऊराव कदम या शेतकऱ्यांनी नापीक, दुष्काळ, कर्ज बाजारी पणा मुळे तणावातून आत्महत्या केली होती.
शेतकऱ्यास दोन मुली व एक मुलगा असून मुलीचे लग्न शिक्षण व घर कसे चालवायचे याची चिंता होती मनरेगा विहिरी चे बिल मिळाले नव्हते व ती विहीर बांधण्यासाठी कर्ज घेऊन बांधली होती या विवेचनातून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती .यामुळे घरचा आधार गेल्याने या कुटुंबाला उपजिविकेसाठी मदतीची खरी गरज असल्याने सर्वात प्रथम रुपेश बेद्रे यांनी या कुटुंबास मदतीचा हात दिला आहे एक शिलाई मशीन या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी भेट देण्यात आले आहे. यामुळे कुटुंबाला एक आधार देण्याचे काम त्यांनी यावेळी केले आहे व यापुढेही मुलींचे शिक्षण व लग्नासाठी देखील मदत करू असे त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय नेते फक्त आश्वासन देतात परंतु कृतीत काहीच करत नाहीत त्यास कृतीत आणणारे रुपेश बेद्रे हे एकमेव नेते आहेत .यावेळी दिलेला शब्द पाळणारे म्हणून त्यांची एक समाजात ओळख निर्माण झाली आहे .कुठलीही शैक्षणिक सामाजिक अडचण आल्यास तुमच्या मदतीला कधीही येईल व विहिरीच्या बिलासंदर्भात कलेक्टर ला भेटून योग्य मार्ग काढू असे त्यांनी यावेळी सांगितले .
यावेळी उपस्थित जालिंदर बेद्रे सर ,योगेश ठोसर (जिल्हाध्यक्ष VBVP), अक्षय कदम, शिवराज कदम ,रोहित कदम, दिलीप कदम ,गोकुळ कदम व रामदास भाकरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.