विकासकासाठी मंदिराच्या तिजोऱ्या रिकाम्या कराव्यात..! गडकिल्लेच का ?

पाटोदा तालुक्यातील तरुणाचा सरकारला सवाल

पाटोदा:आठवडा विशेष टीम―लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये भाजप सरकारने छत्रपतींचा आशीर्वाद चलो चाले मोदीजीके साथ या वाक्याखाली सत्ता स्थापन केली,केंद्र सरकारने सत्ता होती येताच केंद्रातील दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला भाड्याने दिला, आणि त्यांचेच शिष्य आता राज्यातील किल्ले, विशिष्ट संस्था आणि व्यक्तींच्या घशात घालायला निघाले आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे, विकासाच्या नावाखाली खाजगीकरणाच्या माध्यमातून पर्यटन महामंडळाच्या मालमत्ता ज्यांच्या खिशात या आधीच टाकल्या आहेत त्यातुन कोणता विकास झाला? याचे वाईट अनुभव असताना, काश्मिरमध्ये रिसॉर्ट बांधणे असो की, गडकिल्ले भाड्याने देणे असो, हे निर्णय महाराष्ट्राला खड्यात घालणारा आहे.
महाराष्ट्राचं वैभव म्हणजे आपले महाराजांचे गडकिल्ले याच गडकिल्ल्यां मुळे आज आपण आहोत. कित्येक मावळ्यांनी या गडकील्यांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली,बलिदान दिले,कशासाठी..?तर स्वराज्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आता हेच गडकिल्ले लग्न समारंभासाठी वापरले जाणार त्यावर हेरिटेज हॉटेल्स होणार. या साठीच आपल्या मावळ्यांनी बलिदान दिले का..? पुढे चालून आपल्या लग्ना साठी लागणाऱ्या हॉटेल ची सोय व्हावी यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले का..?
यांनी २५ किल्ले निवडले आहेत ज्यांचा वापर हॉटेल साठी आणि लग्न समारंभासाठी होणार आहे,आज वर अनेक संतापजनक निर्णय या सरकारने घेतेले पण या निर्णयाने तर सगळ्या गोष्टींचा कळसच गाठला..!आपल्या महाराजांचं इतिहास म्हणजे हे गडकिल्ले त्या इतिहासाचं संवर्धन करायचं सोडून त्याच गडकिल्ल्या वर यांना हॉटेल बांधायचे आहेत. सगळ्या लाजा विकल्या आहेत. खबरदार जर गडकिल्ल्याकडे असली विकृती आणली तर..!
हे गडकील्ले म्हणजे शौर्याच प्रतीक आहेत.
राज्य शासनाने पर्यटन स्थळ विकास व हेरिटेजच्या माध्यमातून गडकोट व किल्ले संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केली होती,त्या तरतुदीसाठी राज्यसरकारला निधी उपलब्ध करता आला नाही,हा त्यांचा कमीपणा झाकण्यासाठी हे सरकार हा तुघलकी निर्णय घेणार आहे का असा प्रश्न आज शिवप्रेमी व अखंड महाराष्ट्राला पडला आहे,मुख्यमंत्री साहेब व राज्याचे पर्यटन मंत्री रावल साहेब जनतेच्या व शिवप्रेमी यांच्या आक्रोशानंतर हा निर्णय मागे घेत आहे,पण या राज्यकर्त्याना हा निर्णय सुचतोच कसा…? जर तुम्हाला विकासनिधी उपलब्ध करायचा असेल तर तुम्ही नेत्यांची व मंत्री महोदयांची अवाढव्य शासकीय निवासस्थान भाड्याने द्यावीत,ऐव्हढ्यावरही जर निधी होत नसेल तर,राज्यातील विविध मंदिरातील तिजोऱ्या रिकाम्या कराव्यात,की ज्या मंदिरात अंधश्रद्देच्या नावाखाली हजारो लाखोंचे महापूजा वअभिषेक होतात अशा मंदिराच्या तिजोऱ्या रिकाम्या करा,पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले बुरुज व गढी यांच्यावर कुणाचाही ताबा चढू देणार नाही,असा इशारा तालुक्यातील एक शिवप्रेमी शाहू फुले आंबेडकर विचारसरणी असलेला आक्रमक युवक इंजि. दत्ता हुले यांनी प्रसिद्धीपत्रकातून सरकारला दिला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.