सोयगाव दि.०९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ता.१३ होवू घातली असून त्यासाठी सोमवारी ता.९ नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी पहिला दिवस होता.पहिल्याच दिवशी भाजपकडून कैलास काळे आणि शिवसेनेकडून प्रतिभा बोडखे यांचा प्रत्येकी एक अर्ज पाप्त झाल्याची माहिती पीठासन अधिकारी ब्रजेश पाटील यांनी दिली.
यावेळी भाजप आणि शिवसेना या दोघांनी प्रत्येकी एक परस्परविरुद्ध अर्ज दाखल केल्याने सोयगावात युती तुटली आहे.सोमवारी अर्ज भरण्याची व छाननीची प्रक्रिया हाती घेण्यात आली.यामध्ये दोघांचे अर्ज छाननीत वैद्य ठरले असून नगराध्यक्ष पदासाठी दोघांची सरळ लढत होणार आहे.ता.१२ अर्ज माघारीची मुदत आहे.तर त्यानंतर ता.१३ निवडणूक घेण्यात येणार आहे.यामध्ये शिवसेनेचे तीन नगरसेवकांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेकडे सध्या चार नगरसेवक असून भाजपकडे सध्या १३ नगरसेवकांची संख्या बलाबल असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळणार आहे.
प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील,नायब तहसीलदार सतीश देशमुख,शेख मकसूद,मुख्याधिकारी सचिन तामखंडे आदींनी कामकाज पहिले.