डॉ.अशोक थोरात व बजरंग सोनवणे रोटरी भुषण पुरस्काराने सन्मानित

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्‍वरीचा पदग्रहण सोहळा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्‍वरीच्या वर्ष 2019-2020 चे अध्यक्ष म्हणून रो. सदाशिव सोनवणे तर सचिव म्हणुन रो.संतोष रेपे यांनी पदभार घेतला. नूतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा मंगळवार,दि.3 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी येडेश्‍वरी शुगरचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात (बीड) यांना रोटरी भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रो.व्यंकटेश चन्ना (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2017-18) हे होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रविण शिनगारे (माजी आरोग्य संचालक,महाराष्ट्र शासन) तसेच रो.आनंद कर्नावट (उपप्रांतपाल, डिस्ट्रिक्ट 3132), सत्कारमुर्ती बजरंग सोनवणे,डॉ.अशोक थोरात,नुतन अध्यक्ष
रो.सदाशिव सोनवणे, नुतन सचिव रो.संतोष रेपे,माजी अध्यक्ष रो.पांडुरंग पाखरे,माजी सचिव रो.सर्जेराव मोरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मंगळवार,दि.3 सप्टेंबर 2019 रोजी सायं.5.30 वाजता अनिकेत मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी मावळते अध्यक्ष रो.पांडुरंग पाखरे यांनी नुतन अध्यक्ष रो.सदाशिव सोनवणे व मावळते सचिव रो.सर्जेराव मोरे यांनी नुतन सचिव रो. संतोष रेपे यांचे सहीत नविन कार्यकारीणीकडे पदभार सोपवला. प्रारंभी सामुदायिक जिजाऊ वंदनेने सुरूवात झाली व गतवर्षात निधन पावलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिपप्रजवलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला.पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुतन अध्यक्ष रो.सदाशिव सोनवणे यांनी केले.तर मावळते अध्यक्ष रो.पांडुरंग पाखरे यांनी गतवर्षीच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले. या सोहळ्यात राजकीय, सहकार,उद्योग व सामाजिक क्षेञात बांधिलकी मानून कार्य करणारे येडेश्‍वरी शुगरचे चेअरमन बजरंग (बप्पा) सोनवणे तसेच बीड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेञात शासकिय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील कोना-कोपर्‍यातून गोरगरीब, गरजू रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेवून तत्पर व दर्जेदार वैद्यकिय सेवा देणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात (बीड) यांना रोटरी भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले.यावेळी बजरंग सोनवणे व डॉ.अशोक थोरात यांनी सत्काराला उत्तर दिले. उपप्रांतपाल रो.आनंद कर्नावट यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.तर डॉ.प्रविण शिनगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यंकटेश चन्ना यांनी,“योगेश्‍वरी रोटरीच्या सामाजिक बांधिलकी माणून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले”. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार सचिव रो.संतोष रेपे यांनी मानले.पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष रो.
सचिन कराड,सचिव रो. स्वप्नील परदेशी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रो.सुहासिनी मोदी,सचिव रो.अंजली चरखा यांच्यासहीत योगेश्‍वरी रोटरीचे माजी अध्यक्ष पांडुरंग पाखरे,शेख साजेद, धनराज मोरे,श्रीरंग चौधरी,पुरूषोत्तम वाघ,मनोहर कदम, परमेश्‍वर करपे,एस.बी. सय्यद,प्रशांत बर्दापुरकर,ज्योती शिंदे, जनार्धन मुंडे,राजेंद्र घोडके,बालाजी घाडगे, सर्जेराव मोरे,वामन जोशी,विश्‍वनाथ गिरगिरवार,राजाराम पोतदार,अशोक खाडे, ज्ञानेश्‍वर किर्दंत,कोंडीबा राऊत,वनमाला वाघ, सुशिला चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती.वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.