महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यात ‘संविधान से स्वाभिमान’ यात्रेचा शुभारंभ

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या वतीने
अंबाजोगाई तालुक्यात संविधान से स्वाभीमान या यात्रेचा शुभारंभ केज विधानसभा मतदार संघातील मांडवा (पठाण) येथील विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शनिवार,दि.7 सप्टेंबर रोजी करण्यात आला.

‘संविधान हे स्वाभिमानाचे प्रतिक आहे.संविधानाच्या बचावासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन संविधान से स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.’
शनिवार,दि.7 सप्टेंबर रोजी नागपुर येथील दिक्षाभुमी वरून ‘संविधान से स्वाभिमान’ यात्रेचा शुभारंभ अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.नितीन राऊत,राष्ट्रीय समन्वयक मनोज बागरी,अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजयदादा अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याच दिवशी केज विधानसभा मतदारसंघातील
अंबाजोगाई तालुक्यात मांडवा (पठाण) येथील विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून
संविधान से स्वाभीमान या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संजय वाघमारे,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव जगतकर, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, भगवानराव ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संजय वाघमारे,अ‍ॅड.अनंतराव जगतकर व वसंतराव मोरे यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवानराव ढगे यांनी करून उपस्थितांचे आभार कचरू जोगदंड यांनी मानले.यावेळी मांडवा पठाण येथील विनायक जोगदंड, निखील गायकवाड, शेषेराव जोगदंड, सोनाजी तरकसे,सौरभ गोरे,गौतम जोगदंड, तात्याराव जोगदंड,बंडु जोगदंड,प्रताप जोगदंड आदींसहीत इतरांची प्रमुख उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.