पाटोदा तालुक्यात ७.७७ कोटीच्या विविध विकास कामाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते उदघाटन व भूमिपूजनाचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडला

पाटोदा:प्रदिप नागरगोजे―पाटोदा तालुक्याला विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्धगटनाचा कार्यक्रम आज दासखेड येथे धुमधडाक्यात पार पडला, पुडील कामाचा भूमिपूजन पार पडले दासखेड ते पाचंग्री 2 कोटी, दासखेड ते वैद्यकीन्ही रोडवर बाजीबाबा मंदिर येथे 1.77 कोटीचा रुपयाचा पूल, भायाळा ते कचरवाडी घाट रस्ता 1 कोटी रुपये, पाटोदा ते साकत रस्ता सुधारणासाठी 1.60 कोटी रुपये, हातोला फाटा ते गहिनीनाथ गड रस्ता सुधारणा 2 कोटी रुपये, दासखेड येथे 25/15 अंतर्गत बाजीबाबा मंदिर नदी घाट काम 20 लक्ष रुपये, दासखेड येथे 25/15 अंतर्गत सिमेंट रस्ता 10 लक्ष रुपये, सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दलित वस्ती येथे सभामंडप 5 लक्ष रुपये व सिमेंट रस्ता 3 लक्ष रुपये, इत्यादी कामाचे भूमिपूजन झाले, व दासखेड गावा अंतर्गत विविध कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला, निरंजन हीरानंदानी यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन 2 कोटी रुपये, सामाजिक दायित्व अंतर्गत महिलासाठी स्वच्छताग्रह व शौचालय 55 लक्ष रुपये, खासदार राजकुमार धुत यांच्या फंडातून स्मशनभूमी 20 लक्ष रुपये इत्यादी कामाचा लोकार्पण सोहळा पार पडता कार्यक्रमध्ये बोलताना आमदार भीमरावजी धोंडे साहेबांनी सांगितलं या पाच वर्षा मध्ये रस्त्यासाठी काम केलं. तालुक्यातील जवळपास सर्वच रस्ते पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्याने पूर्ण केले आहेत.मी तुमच्यासाठी काम करत आहे आणि पुढे ही काम करत राहील मला तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद असेच पुढे ही कायम राहुद्या, या पाच वर्षा मध्ये रस्त्यासाठी प्रामुख्याने काम केलं आता पुडील पाच वर्षे पाण्यासाठी काम करणार आहे, यांची सुरुवात वॅटरग्रीड योजना मंजूर झाली असून या योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासह आष्टी-पाटोदा-शिरूर दुष्काळ मुक्त करायचं आहे यासाठी व इतर सिंचन वाडीसाठी पुडील पाच वर्ष काम करायचे आहे.
या कार्यक्रमासाठी भाजपा युवा नेते गणेश कोकाटे यांनी कार्यमाचे निवेजन व प्रस्तावना केली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुंदरराव पाटील होते,
या कार्यमासाठी उपस्थित युवा नेते अजय (दादा) धोंडे, मधुकर गर्जे, ता अध्यक्ष सुधीर घुमरे, सभापती बाबान सोनवणे, पांडुरंग नागरगोजे, आष्टी रिपाई अध्यक्ष साळवे, अनुरथ सानप, संतोष राख, देविदास शेंडगे, काकासाहेब लांबरुड, नरेंद्र जावळे,अशरफ सय्यद, आबासाहेब पवार, संजय कांकरिया, सतीश बांगर, विनोद बांगर, बंडू अरसुळ, शाम हुले, बंडू सव्वाशे, दिलीप मस्के, युवराज कोकाटे, यांच्या सह पाटोदा तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व दासखेड येथील गावकरी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.