पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील व शहरातील समविचारी युवकांच्या संकल्पनेतून ‘चला एक पाऊल पर्यावरण संवर्धनासाठी टाकुया !’ या उद्दिष्टाने,वाढती लोकसंख्या वृक्षतोड, नद्यांचे व पाण्याचे वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल न राखल्याने आपल्यावर संकट ओढवते आहे,कधी ओला,तर कधी कोरडा दुष्काळ,नद्यांचे पाणी दूषित होत आहे, यामुळेच गणेश विसर्जनामुळे होणारे पाणी, नदी व पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन अभियान राबविले आहे तरी पाटोदा शहरातील घरोघरी बसवलेले व बाल गणेश मंडळांचेे गणपती बप्पा व त्यांचे निर्माल्य (नारळ,हार,फुले, हरळी,प्लास्टिक) आमच्या विसर्जन केंद्रावर विसर्जन करावे,आम्ही त्या मूर्तीचे व निर्माल्याचे विभाजन करून नगरपंचायतच्या माध्यमातून योग्य पर्यावरपुरक विघटन करणार आहोत.
यासाठी पाटोदा शहरात दोन ठिकाणी विसर्जन केंद्र ठेवले आहे पाहिले रेणुकामाता मंदिरासमोर पी.व्ही.पी.कॉलेज रोड पाटोदा येथे व दुसरे विश्वजित जनरल स्टोअर्स बस स्टँड समोर पाटोदा येथे केले आहे येथे नियोजन आर्टिस्ट दत्ता वाघमारे व दत्ता देशमाने यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, अगदी आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार गणपतीची मूर्ती तुमच्या हस्ते पाण्यामध्ये विसर्जित करून बाप्पांची मूर्ती व निर्माल्य (पूजेचे साहित्य) याचे विभाजीकरण करून त्याचे पर्यावरणपूरक विघटन करणार आहोत.
या माध्यमातून आपण पाणी व नदी प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करत आहोत,त्यामुळे आपले प्रोत्साहन महत्वाचे आहे,असे आव्हान दत्ता हुले,दत्ता देशमाने, दत्ता वाघमारे या युवकांनी केले आहे.