सोयगाव: कवली,ता.सोयगाव नाल्याच्या वळण रस्त्याच्या पाण्यात अडकली दोन वाहने,प्रवाशांची आरडओरड

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव-बनोटी रस्त्यावरील कवली गावाजवळील नळकांडी पुलाचे अर्धवट असलेल्या कामामुळे नाल्यावरील पुलाच्या शेजारी असलेल्या खदाणीच्या पाण्यात दोन वाहने अडकल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे घडली,दरम्यान वाहनातील प्रवाशांना वाहनाच्या खाली उतरता येत नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर सार्वजनिक विभागाच्या नळकांडी पुलाचे पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत काम आहे.परंतु या पुलाच्या बाजूने काढण्यात आलेल्या वळण रस्त्याच्या बाजूला पाण्याची खदान आहे.नुकताच झालेल्या सोमवारी दिवसरात्र पावसाने या खदानीला मोठा पूर आल असतांना मंगळवारी पहाटे सोयगाव कडून बनोटी आणि पिंपळगाव(हरे)ता.पाचोराकडे जाणाऱ्या अपे रिक्षा आणि चारचाकी वाहनांना पाण्यातच राहावे लागले दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य करून या वाहनातून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले होते.

सार्वजनिक विभागाचा नळकांडी पूल अर्धवट-

सोयगाव-बनोटी रस्त्यावर असलेला हा नळकांडी पुलाचे काम तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे.त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुकीची चांगलीच कोंडी झालेली असतांना या पुलाच्या बाजूने पाण्याची खदान असल्याने या रस्त्याचा वळण रस्ता धोकादायक झालेला आहे.पुलाच्या अर्धवट काम आणि धोकादायक झालेला वळण रस्ता या बाबींकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे सोयगाव-बनोटी रस्त्यावरील वाहतूक पावूस झाल्यावर ठप्प होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असतांना त्यातच बाजूलाच असलेल्या खदाणीच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना धोका झाला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.