सभापती हुले बापु यांनी आमदार धस यांच्याविषयी व्यक्त केली नाराजी ; तालुक्यातील विकासकामांना बापूची गैरहजेरी

पाटोदा:आठवडा विशेष टीम―आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील लोकप्रिय नेते बीड लातूर उस्मानाबाद विधान परिषदचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी तालुक्यातील विकासावर व ढाळेवाडी गावच्या अनेक मुद्यांवर दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याने सुरेश धस यांचे अंत्यत जवळचे असणारे पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. तात्यासाहेब हुले यांची सुरेश धस यांच्या विकासकामांच्या उदघाटना गैरहजरी असल्याचे कळते.
आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून हुले बापु हे राजकारणात होते,तालुक्यातील एक खर्डे वक्ते व नेते म्हणून बापूंची ओळख आहे, तेव्हापासून सुरेश धस व हुले बापू यांचा राजकीय स्नेह वाढत गेला,हुले बापू हे गावचे सरपंच, पंचायत समिती सभापती, महसूल पणनचे राज्यसचिव व आता बाजार समितीचे सभापती आहेत, वेळोवेळी तालुक्यातील विकासकामे व अन्य प्रश्न सुरेश धस यांच्याकडे घेऊन गेले असता त्यांनी खूप अश्वासने दिले पण १५ वर्षात त्यांनी कुठलेलंही आश्वासन पूर्ण केले नाही,
तालुक्यातील महासांगवी, सौताडा,वैद्यकीही,धनगरजळूका,व अन्य तालुक्यातील तलावांच्या उंची वाढवण्याचा मुद्दा, पारगाव अनपटवाडी,नफरवाडी या गावांना पटाचे पाणी मिळावे, कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या तलावांना बॉन नाही, त्यांना मंजुरी मिळावी.आरनई मांजरा व वांजरा नदीवर किट वेअर (बंधारे) यांची गरज आहे,श्रावण बाळ,राजीव गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत व्हावी या अनके समस्यांमुळे तालुक्यातील ऊसतोडणीला जाण्याचे प्रमाण वाढतं चालले आहे,अश्या अनेक वेगवेगळ्या कामांची अश्वासने सुरेश अण्णा धस यांनी वेळोवेळी दिले होते,त्याचबरोबर सुरेश अण्णा धस यांनी जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्ते जे साधे ग्रामपंचायतचे सदस्यही नाहीत अश्यांना जवळ केल्याने तालुक्यातील विकासकामे यांना ब्रेक बसला आहे व सगळीकडे फक्त फोटोग्राफी व पेपेरबाजी असल्याचे त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आ. सुरेश अण्णा धस यांनी ठामपणे दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास हुले आम्ही वेगळा मार्ग स्वीकारु असे सभापती मा.तात्यासाहेब हुले बापूंनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.