गिरवली आपेट येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगिण विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटीबद्ध आहे.जनतेचे सर्वांगिण विकासाचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुर्ण करणार आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.त्या तालुक्यातील गिरवली आपेट येथे विविध विकास कामांच्या भूमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली आपेट येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,जिल्हा परिषद डी.पी.डी.सी.अंतर्गत आणि आमदार फंडातून विविध विकास कामांसाठी भरीव निधी प्राप्त झाला. यातील भूमिपुजन व पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले हे होते.तर व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काका लोमटे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख,तालुका समन्वयक समितीचे प्रमुख गणेश कराड, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप, बीडीओ गणोरकर,फड साहेब,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप गंगणे,महादेव फड,बंडु चाटे,बिभिषण फड, मुबारक पटेल, पंजाबराव धायगुडे, अस्लम पटेल, सोमनाथअप्पा गणपत अप्पा गिरवलकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव शामराव आपेट,शशिकांत धायगुडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गिरवली आपेट येथे पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव शामराव आपेट यांच्या प्रयत्नातून रस्ते,सामाजिक सभागृह,कंपाऊंड वॉल, नविन सिमेंट रस्ते, सार्वजनिक स्मशानभूमी तसेच मागासवर्गीय बांधवांसाठीची स्मशानभूमी,हायमस्ट पथदिवे,सिमेंट रस्ते, हनुमान मंदिर,सटवाई देवी मंदिर,शितलदास मंदिर,विठ्ठल-रूक्मीणी मंदिर,महादेव मंदिर, खंडोबा मंदिर या सर्वांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव शामराव आपेट यांनी केले.तर सुत्रसंचालन नामदेव मुंडे यांनी करून उपस्थितांचे आभार सुग्रिव आपेट यांनी मानले.